एका गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ? संजय राऊत खवळले
मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला असला तरी गृहमंत्रीपदावरून महायुतीमध्ये कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शपथविधीची तारीख जवळ आली, तयारी सुरू झाली तरी गृहमंत्रीपद आणि अन्य मंत्रीपदाबाबत काही निश्चित निर्णय नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 10 दिवस होत आले तरी अजून राज्यात सरकार स्थापनेबाबत निश्चित निर्णय नाही. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला असला तरी गृहमंत्रीपदावरून महायुतीमध्ये कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शपथविधीची तारीख जवळ आली, तयारी सुरू झाली तरी गृहमंत्रीपद आणि अन्य मंत्रीपदाबाबत काही निश्चित निर्णय नाही, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
भारतीय जनता पक्ष जगाताल पहिल्या क्रमांकाचा प्रश्न, नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता , अमित शाह आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांसारखे मजबूत नेते आहेत ना इथे. एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडलंय, मग हे कसले मजबूत लोक ? असा टोला राऊत यांनी लगावला. तुमच्याकडे बहुमताचा आकाडा, अजित पवार आहेत, बहुमत असतानाही तुम्ही शपथ घेत नाही, राज्याला सरकार देत नाही, सत्तास्थापनेचा दावा अद्याप करत नाही, आणि मग तुम्ही मांडव कसला घालता ? काय प्रकार आहे हा ? राजभवन तुम्ही चालवताय का अशा शपब्दात राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे एका गृहमंत्रीपदावरून झालेलं नाही. भाजपने मनात आणलं तर समोरच्या लोकांना एका क्षणात चिरडतील, अशी टीकाही त्यांनी केली.