मला मारण्याचा प्रयत्न, योग्य वेळी खुलासा, संजय राऊत यांचा इशारा कुणाला ?
राजापूर तालुक्यातील हत्या करण्यात आलेले पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार राजन साळवी उपस्थित होते.
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील हत्या करण्यात आलेले पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार राजन साळवी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. अफझलखानाने जसा विडा उचलला त्यापद्धतीने आता कोण आडवे येतो ते पाहतो असे सांगायला काहींनी सुरवात केली आहे. आडवे येणाऱ्यांचे असे खून करायचे. असे किती खून करणार आहात आणि किती खून पचवणार आहात असा सवाल करतानाच मला तुरुंगात पाठवले. जवळजवळ मला मारण्याचा प्रयत्न केला. आता सांगायची वेळ नाही पण योग्य वेळी खुलासा करू. माणसे संपविण्यासाठी तुम्हाला सत्तेत आणून बसवले आहे का ? अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
Published on: Feb 17, 2023 02:20 PM
Latest Videos