विनायक राऊत यांचा टोला नेमका कुणाला? उद्धव ठाकरे अशा भाडोत्री लोकांमुळे…
मुंबई : उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) गटाने जे काही पुरावे दिले आहेत. त्याची निवडणूक आयोगाने जेवढी पाहिजे तितकी तपासणी करावी. या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा आहे. आमची उत्कंठा वाढत असली तरी निकाल आमच्याच बाजूने लागले हा आम्हाला १०० टक्के आत्मविश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. मात्र, निवडणूक […]
मुंबई : उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) गटाने जे काही पुरावे दिले आहेत. त्याची निवडणूक आयोगाने जेवढी पाहिजे तितकी तपासणी करावी. या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा आहे. आमची उत्कंठा वाढत असली तरी निकाल आमच्याच बाजूने लागले हा आम्हाला १०० टक्के आत्मविश्वास आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा घेण्यास परवानगी दिली नाही तरी नैसर्गिक न्यायाने निवडणूक होत नाही तोपर्यंत त्यांचे पद कायम राहील.
शिंदे गटाचा राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा प्लॅन असला तरी तसे करणे कुणाच्याही बापाला जमणार नाही. कारण ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देणं आहे. कोणी दिवास्वप्न बघत असेल तर ते तसेच राहील. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद शिवसैनिकांनी दिले आहे. ते अशा भाडोत्री लोकांमुळे खेचले जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.