आज माईक ओढला उद्या पँट ओढणार….
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पुन्हा विधानसभेचे पायरी चढू देऊ नका असं सांगत त्यांनी कट्टर शिवसैनिकांना निवडून देण्याचे आवाहनही त्यानी कोल्हापूरातील निर्धार मिळाव्यात केले.
आता आलेले सरकार हे काही जास्त दिवसाचे नाही तर ते औटघटकेचे सरकार असल्याचे टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूरातील निर्धार मेळाव्यात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक ओढून घेतला त्यावर टीका करत ते म्हणाले की, आज माईक ओढेल, उद्या पॅंट ओढणार आहे, आणि या सरकारला नागडं करुन सोडल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका त्यांनी कोल्हापूरात केली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पुन्हा विधानसभेचे पायरी चढू देऊ नका असं सांगत त्यांनी कट्टर शिवसैनिकांना निवडून देण्याचे आवाहनही त्यानी कोल्हापूरातील निर्धार मिळाव्यात केले.
Published on: Jul 15, 2022 07:17 PM
Latest Videos