उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली, पुढची दिशा काय?

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली, पुढची दिशा काय?

| Updated on: Jan 11, 2023 | 1:37 PM

निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Shivsena : निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपायला केवळ बारा दिवस उरले आहेत. शिवनसेना पक्ष अन् चिन्हाबाबतचा फैसला अद्याप झालेला नसताना आता ठाकरेगटासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय?