संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक, औरंगाबादमध्ये जोडे मारो आंदोलन
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केली होती. राऊत यांनी केलेल्या कृत्याचा शनिवारी शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमधील क्रांती चौकात संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले.
औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केली होती. राऊत यांनी केलेल्या कृत्याचा शनिवारी शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमधील क्रांती चौकात संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला. “संजय राऊत हे मनोरुग्ण झाले असून त्यांना वेड्याच्या दवाखान्यात दाखल करून, त्यांच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा”, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे.
Published on: Jun 04, 2023 09:22 AM
Latest Videos