कराड शहरात पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंचे बॅनर हटवले

| Updated on: Jun 24, 2022 | 5:05 PM

कराड शहरात अज्ञात व्यक्तीकडून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. स्थानीक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून बॅनर हटविण्यात आले. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारेबाजीसुद्धा करण्यात आली. शहरात बॅनर नेमके कोणाकडून लावण्यात आले याची अद्याप माहिती नसली तरी बॅनरच्याखाली एक शिवसैनिक असे नमूद करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिसेनेत दोन गट […]

कराड शहरात अज्ञात व्यक्तीकडून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. स्थानीक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून बॅनर हटविण्यात आले. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारेबाजीसुद्धा करण्यात आली. शहरात बॅनर नेमके कोणाकडून लावण्यात आले याची अद्याप माहिती नसली तरी बॅनरच्याखाली एक शिवसैनिक असे नमूद करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिसेनेत दोन गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असून दुसरा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध निदर्शने करीत आहेत. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीला ऊत आला आहे. विरोधी पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावीत त्यांच्या उख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहू लागले आहे.

 

Published on: Jun 24, 2022 05:05 PM