गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढा

गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढा

| Updated on: Jul 16, 2022 | 7:39 PM

आम्ही कडवट आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्हाला कोण गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बांगर यांनी दिला आहे.

आम्हाला कोणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढण्याची ताकद आम्हा शिवसैनिकांमध्ये आहे असा विश्वास शिवसेनेतील हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी केला. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत असं सांगत त्यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांवर केला आहे. शिवसेनेतील संजय राऊत, विनायक राऊत आणि इतर मंडळींनी ज्यावेळी बंडखोर आमदारांवर टीका केली त्यावेळी त्या सगळ्यांना गद्दार आमदार अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यामुळे आज संतोष बांगर यांनी बोलताना सांगितले की, आम्ही कडवट आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्हाला कोण गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बांगर यांनी दिला आहे.