कमजोर लोग…!शिवसेनेची बॅनरबाजी, तर भाजपची टोलेबाजी
भाजप आणि शिवसेनेतील वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. हा वाद आता थेट उल्हासनगरापर्यंत पोहोचला आहे. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे. तर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याला उत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे.
ठाणे : भाजप आणि शिवसेनेतील वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. हा वाद आता थेट उल्हासनगरापर्यंत पोहोचला आहे. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे. तर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याला उत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे. कल्याण लोकसभेत शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपताना दिसत नाहीये.उल्हासनगरमध्ये अरुण आशान यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावला आहे. “कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है…! माझा नेता माझा अभिमान” अशा आशयाचे बॅनर लावून त्यांनी भाजपला डिवचलं आहे. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत टोला लगावला आहे. “युतीची सत्ता आल्यावर छोटे छोटे काही कार्यकर्ते आहेत ते आम्हीच शिंदे साहेब आहोत, आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, असा त्यांना गर्व झाला आहे, त्यांना वाटतं आमच्याशिवाय कोणीच नाही”, असं भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणालेत.