Saamna Editorial | 'आणखी एक पॅकेज', सामनातून मोदी सरकारवर टीका

Saamna Editorial | ‘आणखी एक पॅकेज’, सामनातून मोदी सरकारवर टीका

| Updated on: Jun 30, 2021 | 8:52 AM

कोरोना महामारीने कोसळलेल्या आरोग्य आणि इतर क्षेत्रांना सांभाळणे, उभे करणे हे केंद्र सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान आहे . त्या दृष्टीने 1 लाख 10 हजार कोटींचे आर्थिक लसीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला, असे म्हणता येईल.

केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हटले की चर्चा, टीकाटिपणी होणारच… गेल्या वर्षीच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजवरही ती झाली होती आणि आताच्या 1 लाख 10 हजार कोटींच्या पॅकेजवरदेखील होत आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नवीन पॅकेजकडे पाहावे लागेल. कोरोना महामारीने कोसळलेल्या आरोग्य आणि इतर क्षेत्रांना सांभाळणे, उभे करणे हे केंद्र सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान आहे . त्या दृष्टीने 1 लाख 10 हजार कोटींचे आर्थिक लसीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला, असे म्हणता येईल. आता ही ‘लस’ अर्थव्यवस्थेसाठी ‘प्रभावी’ ठरते की ‘आणखी एक पॅकेज’ अशी त्याची नोंद होते हे भविष्यातच समजेल, असं आजच्या सामनाच्या (Saamana Editorial) अग्रलेखात म्हटलं आहे.

Published on: Jun 30, 2021 08:52 AM