Sanjay Raut : बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात – संजय राऊतांचा आरोप

| Updated on: Dec 27, 2024 | 10:44 AM

बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही, त्याची माहिती वारंवार पुढे आली आहे. संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही. संजय राऊतांनी बीडमधील हत्येवरून सरकारवर आरोप करत धारेवर धरलं आहे.

बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले, बीड मधील गावात लहान पोरं हातात बंदूक घेत असल्याचे फोटो समोर येत आहे. आणि हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात, त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

तुम्ही काय पेरत आहात जे पेरल ते उगवलं आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही, त्याची माहिती वारंवार पुढे आली आहे. संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही. जर आरोप आहे, त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री दुबळे आहेत , कमजोर आहेत. गृहमंत्री नाकाने कांदा सोलत आहेत अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

Published on: Dec 27, 2024 10:44 AM