मानसिक स्थिती बिघडल्यानं चेतनकडून गोळीबार, आरपीएफ वरिष्ठ अधिकऱ्याने दिली माहिती

“मानसिक स्थिती बिघडल्यानं चेतनकडून गोळीबार”, आरपीएफ वरिष्ठ अधिकऱ्याने दिली माहिती

| Updated on: Jul 31, 2023 | 1:28 PM

जयपूर ते मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे.

मुंबई, 31 जुलै 2023 | जयपूर-मुंबई एक्सप्रेस मध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतन कुमारला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. यानंतर मीडियाशी संवाद साधताना आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिन्हा यांनी कॉन्स्टेबल आणि एएसआयमध्ये कोणताही वाद झाला नसून, चेतन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले.

 

Published on: Jul 31, 2023 01:28 PM