Video : मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास उद्यापासून कारवाई
सर्वोच्च न्यायालयाकडून बीएमसीच्या कारवाईबाबत स्थगिती नसल्याने मुंबई महापालिकेला कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास उद्यापासून मुंबई महापालिकेकडून (BMC) कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) बीएमसीच्या कारवाईबाबत स्थगिती नसल्याने मुंबई महापालिकेला कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील (Mumbai ) सर्व छोट्या मोठ्या दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते. त्यामुळे उद्यापासून ज्या दुकानावर मराठी पाट्या नसतील त्या दुकानावर कारवाई होणार आहे.
Published on: Sep 30, 2022 03:05 PM
Latest Videos