Ajit Pawar | म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा, केंद्राने इंजेक्शनचा साठा वाढवावा : अजित पवार

| Updated on: May 21, 2021 | 7:03 PM

कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील. (Shortage of drugs for mucomycosis, Center should increase injection stock, Ajit Pawar)

पुणे : ‘म्युकरमायकोसिस’ वरील औषधांचे नियंत्रण- म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील, अजित पवार म्हणाले.