वृद्ध आईला खांद्यावर उचलून घेतलं अन् थेट…पाहा माऊलीच्या पालखी सोहळ्यात नेमकं काय घडलं?
माऊलींच्या पालखीचं चौथं गोल रिंगण बाजीरावच्या विहिरी शेजारी असणाऱ्या मोकळ्या शेतामध्ये मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात पार पडलं. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मध्यभागी विराजमान झाल्यानंतर. मानाच्या अश्वानि रिंगण स्थळी दौड घेतली. दौड संपन्न झाल्यावर अश्वंच्या टापा खालची माती भाळी लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
पंढरपूर : संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दुसरं उभं रिंगण बाजीरावच्या विहिरीजवळील रस्त्यावर संपन्न झालं. तर माऊलींच्या पालखीचं चौथं गोल रिंगण बाजीरावच्या विहिरी शेजारी असणाऱ्या मोकळ्या शेतामध्ये मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात पार पडलं. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मध्यभागी विराजमान झाल्यानंतर. मानाच्या अश्वानि रिंगण स्थळी दौड घेतली. दौड संपन्न झाल्यावर अश्वंच्या टापा खालची माती भाळी लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. अश्वंची टापा खालची माती वारकरी प्रसाद म्हणून आपल्या सोबत घेऊन जात असतात. याचदरम्यान येथे एका वेगळ्याच दृशानं अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. येथील पालखी सोहळ्यात श्रावणबाळाचे अनेकांना दर्शन झाले. श्री क्षेत्र कुडगाव, तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून पालखीत एक मुलगा त्याच्या आईला आपल्या खांद्यावर घेऊन रिंगण सोहळ्यात दाखल झाला. त्यावेळी या रिंगण सोहळ्यात आईच्या प्रदक्षिणा झाल्याचे त्यानं सांगितलं. पहा हा व्हिडिओ…