122 गावं 21 जागांसाठी आज मतदान, राजारामचं रणांगण कोण मारणार? निकाल 25 एप्रिलला
राजारामच्या निवडणुकीच्या माध्यमातून 122 गावं आणि साडेसहा तालुक्यांमध्ये निवडणुकीचा धुरळा उघडला. तो आता शांत झाला असून आज मतदान पार पडत आहे. राजाराम साखर कारखान्यासाठी संस्था गटातील एक व उर्वरित गटातील 20 अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे
कोल्हापूर : येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गेली महिनाभर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ढवळून निघालेला आहे. राजारामवरून महादेवराव महाडिक गट आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे आमने सामने आले आहेत. तर राजारामच्या निवडणुकीवरून पाटील-महाडिक वाद पुन्हा एकदा जनतेसमोर आला. राजारामच्या निवडणुकीच्या माध्यमातून 122 गावं आणि साडेसहा तालुक्यांमध्ये निवडणुकीचा धुरळा उघडला. तो आता शांत झाला असून आज मतदान पार पडत आहे. राजाराम साखर कारखान्यासाठी संस्था गटातील एक व उर्वरित गटातील 20 अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तर 58 मतदान केंद्रावर मतदार प्रक्रिया पार पडत आहे. सध्या या मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारखान्यासाठी रविवारी 23 एप्रिलला मतदान होणार असून मतमोजणी मंगळवारी 25 एप्रिलला होईल.