रामनवमीनिमित्त सेनेकडून सोशल मिडीयावर पोस्टरबाजी
लाचारांचा नाही, इथे विचारांचा मान. भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम असे पोस्टर सोशल मीडियावर शिवसेनेकडून पोस्ट करण्यात आले आहेत
मुंबई : श्रीरामजन्मोत्सव, रामनवमीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. राज्यातही विविध ठिकाणी कार्यक्रम पार पाडले जात आहेत. अनेक ठिकाणी रामनवमीनिमित्त शोभा यात्रांचे आयोजन ही करण्यात आलं आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरून निशाना साधला आहे. तसेच ठाकरे गटावर देखील पोस्टरमधून टीका केली आहे.
लाचारांचा नाही, इथे विचारांचा मान. भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम असे पोस्टर सोशल मीडियावर शिवसेनेकडून पोस्ट करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरत ही टीका करण्यात आली आहे.
Published on: Mar 30, 2023 10:03 AM
Latest Videos