“अडीच वर्षात जे केलं नाही, ते आम्ही एका वर्षात केलं”, नाव न घेता श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूरच्या वारीमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी वाखरी येथे या शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
सोलापूर : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूरच्या वारीमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी वाखरी येथे या शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की,
अडीच वर्षात जे काय करु शकले नाहीत.ते आम्ही एका वर्षात करुन दाखवलं.या शिबीरात 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन उपचार केले जाणार आहेत. आतापर्यंत पालखी मार्गावर आरोग्य विभागाच्या वतीने तीन लाख भाविकांची तपासणी पूर्ण झाली आहे तर येत्या वारीत सुमारे दहा लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे.. यासाठी पंढरपुरातील वाखरी ,गोपाळपुर आणि तीन रस्ता अशा तीन ठिकाणी हे महा आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे..