“ठाकरेंना उष्णता सहन होत नसेल म्हणून परदेशात गेले”, श्रीकांत शिंदे यांचा टोला
एकीकडे उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावरून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला आहे.
ठाणे : एकीकडे उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट झाली आहे. या भेटीवरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावरून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला आहे. ठाकरेंनी इथली उष्णता सहन होत नसेल म्हणून ते परदेशात गेले असतील, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. ज्यांच्या नावावर राजकारण केलं, मतं मागितली त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तरी ते येणार आहेत का? पण ज्याठिकाणी ते गेले आहेत तिथल्या राज्याच नुकताच राज्याभिषेक झाला आहे, त्यांना तरी भेटायला जावू नये, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
Published on: Jun 02, 2023 08:32 AM
Latest Videos