Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची – श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधि होती पण मी नकार दिला. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही.माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा… असंही त्यांनी म्हटलंय.
राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तर भाजपला सर्वात अधिक जागा मिळाल्याने याच पक्षाचा नेता सर्वोच्च पदी बसणार हे नक्की. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास फायनल झाले असून आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. तर महायुतीमधील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही महत्वाच्या जागा, खाती मागितली असून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्याची देखील चर्च आहे. मात्र आता त्यावर खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणार का? केंद्रात राहणार की राज्यातअशा अनेक प्रश्नांची उत्तर त्यांनी एका ट्विटमधून दिली आहेत.
माझ्या नावाची उपमुख्यमंत्री पदाची चर्चा निराधार आणि बिनबुडाची असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधि होती पण मी नकार दिला. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही हे स्पष्ट करतो , असंही श्रीकांत यांनी नमूद केलंय. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा… असंही त्यांनी म्हटलंय.