मोठी बातमी ! जाहिरातीवरुन उलटसुलट चर्चा, श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना

मोठी बातमी ! जाहिरातीवरुन उलटसुलट चर्चा, श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना

| Updated on: Jun 14, 2023 | 7:58 AM

शिवसेनेची एक जाहिरात समोर आली. 'दिल्लीत मोदी तर महाराष्ट्रात शिंदे', असा मजकूर या जाहिरातीत छापून आला. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षाही जास्त टक्क्यांचा कौल हा एकनाथ शिंदे यांच्याबाजूने असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी एका सर्व्हेचा दाखला देण्यात आला आहे.

मुंबई: शिवसेनेची एक जाहिरात समोर आली. ‘दिल्लीत मोदी तर महाराष्ट्रात शिंदे’, असा मजकूर या जाहिरातीत छापून आला. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षाही जास्त टक्क्यांचा कौल हा एकनाथ शिंदे यांच्याबाजूने असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी एका सर्व्हेचा दाखला देण्यात आला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उघडपणे शिवसेनेची जाहिरात ही चुकीची असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आज कोल्हापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र जाणार होते. पण फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाला. या सगळ्या घडामोडी घडत असताना श्रीकांत शिंदे मंगळवारी अचानक दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

 

Published on: Jun 14, 2023 07:58 AM