Bhaskar Jadhav On Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; गडकरीच जबाबदार, भास्कर जाधव यांचा आरोप
Bhaskar Jadhav On Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली असून त्याला केंद्रीय भूपृष्टीय मंत्री नितीन गडकरी हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
Bhaskar Jadhav On Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa Highway) चाळण झाली असून त्याला केंद्रीय भूपृष्टीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे (Shivsena) कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. आता करतो, प्रयत्न सुरु आहेत, सर्वांनीच प्रयत्न केले, पण जोपर्यंत गडकरी साहेबांच्या मनात येत नाही, तोपर्यंत कोकणातील रस्ते चांगले होणार नाही असे सुतोवाच त्यांनी केले. गडकरी यांचे उदासीन धोरणच यासाठी कारणीभूत असल्याची टीका ही त्यांनी केली. कोकणातील मुख्य रस्ते जोपर्यंत चांगले होत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून कोकणातील जनतेला दिलासा दिला असे म्हणता येणार नाही. कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच चाकरमानी कोकणात जात आहे, त्याचा प्रवास सुखरुप होऊ दे, असं साकडंही त्यांनी गणरायाला घातले.