100 टक्के ओव्हरफ्लो… दमदार पावसानं 13 छोटी मोठी धरणं भरली; बघा ड्रोनची विहंगम दृश्य
सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जिल्यातील एक मध्यम प्रकल्प असलेलं कोर्ले-सातंडी धरणं आणि १२ लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, पुळास, लोरे, शिरवळ ही धरण १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून महिन्यापासून आजपर्यंत १ हजार ३२२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील १३ छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जिल्यातील एक मध्यम प्रकल्प असलेलं कोर्ले-सातंडी धरणं आणि १२ लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, पुळास, लोरे, शिरवळ ही धरण १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अशातच, हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या सहा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.