महाविकास आघाडीचे सहाची सहा उमेदवार निवडून येतील : दिलीप वळसे-पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी आज राष्ट्रवादीची काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) याची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेची परस्थिती वेगळी होती मात्र आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाय. बी. चव्हाण केंद्रामध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत […]
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी आज राष्ट्रवादीची काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) याची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेची परस्थिती वेगळी होती मात्र आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाय. बी. चव्हाण केंद्रामध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधपरिषद निवडणुकीसाठी कंबर खोचली आहे तर दुसरीकडे भाजपाने त्यांनी रणनीती तयार असून राज्यसभा निवडणुकीपेक्षा जास्त मोठे यश प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण होत असल्याने अपक्ष आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अपक्ष आमदारांची मनधरणी करत असल्याचे दिसून येते.