त्रंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर ‘बर्फ’, व्हायरल व्हिडिओचे सत्य बाहेर, कुणी रचला होता बनाव?
नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करतानाच याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी
नाशिक : नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करतानाच याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. यात मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी पिंडीवर बर्फ ठेवला होता असे उघड झाले. याप्रकरणी देवस्थान समितीने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी त्या तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published on: Feb 09, 2023 10:59 AM
Latest Videos