Aaditya Thackeray : मग महाराष्ट्र काय पाकिस्तानात आहे का? वेदांतावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
गुजरात पाकिस्तानध्ये नाहीतर मग महाराष्ट्र हे राज्य पाकीस्तानमध्ये होते काय? ज्यामुळे तो प्रकल्प या ठिकाणी होऊ दिला नाही. वेदांता प्रकल्प राज्यातून इतरत्र गेला असला तरी यावरुन सुरु असले राजकारण हे संपण्याचे नाव घेत नाही.
मुंबई : (Vedanta Project) वेदांतावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता गेला तरी आगामी दोन वर्षात (Gujrat) गुजरातपेक्षा अधिकचे प्रोजेक्ट हे राज्यात घेऊन येणार असे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही तर गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. गुजरात पाकिस्तानध्ये नाहीतर मग महाराष्ट्र हे राज्य पाकीस्तानमध्ये होते काय? ज्यामुळे तो प्रकल्प या ठिकाणी होऊ दिला नाही. वेदांता प्रकल्प राज्यातून इतरत्र गेला असला तरी यावरुन सुरु असले राजकारण हे संपण्याचे नाव घेत नाही. सत्ताधारी हे महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत आहेत. तर विरोधक हे शिंदे सरकारलाच जबाबदार धरत आहे. आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होत राहिले तरी हा प्रकल्प गेल्याने नुकसान कसे भरुन निघणार हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.