Radhakrishna Vikhe-Patil: …म्हणून कॉंग्रेसची दैनिय अवस्था, विखे पाटलांनी सांगितली कारणे..!
कॉंग्रेस पक्षात वेळेनुसार बदल झाले नाहीत तर मूळ धोरणापासून हा पक्ष दूर गेला आहे. देशपातळीवर योग्य असे नेतृत्व लाभत नाहीतर महाराष्ट्रासारख्या राज्यात केवळे सत्तेसाठी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जे तत्वात नाही ते प्रत्यक्षात होत असताना पाहवयास मिळत आहे. शिवाय गेल्या अडीच वर्षात सत्तेत असूनही वेळोवेळी कॉंग्रेसच्या पदरी अपमानच आलेला आहे.
अहमदनगर : कधी काळी (Congress) कॉंग्रसमध्ये राहिलेले विखे-पाटलांनीच कॉंग्रेसची हा अवस्था कशामुळे झाली हे सांगितले आहे. एकीकडे महागाईच्या विरोधात कॉंग्रेस आंदोलने करीत आहे तर दुसरीकडे अनेकजण पक्ष सोडून (BJP Party) भाजपात दाखल होत आहेत या प्रश्नावर (Radhakrishna Vikhe-Patil) विखे-पाटलांनीच कॉंग्रेसचा इतिहासच सांगितला. कॉंग्रेस पक्षात वेळेनुसार बदल झाले नाहीत तर मूळ धोरणापासून हा पक्ष दूर गेला आहे. देशपातळीवर योग्य असे नेतृत्व लाभत नाहीतर महाराष्ट्रासारख्या राज्यात केवळे सत्तेसाठी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जे तत्वात नाही ते प्रत्यक्षात होत असताना पाहवयास मिळत आहे. शिवाय गेल्या अडीच वर्षात सत्तेत असूनही वेळोवेळी कॉंग्रेसच्या पदरी अपमानच आलेला आहे. असे असतानाही ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकून राहिलेले असतात, त्याप्रमाणे येथील नेत्यांची अवस्था झाल्याचे ते म्हणाले आहेत.