उर्फी जावेद, गौतमी पाटीलला रुपाली चाकणकर यांचा इशारा

उर्फी जावेद, गौतमी पाटीलला रुपाली चाकणकर यांचा इशारा

| Updated on: Apr 20, 2023 | 8:34 AM

उर्फी जावेद हिच्यावर अश्लीलता पसरविण्याचा तर गौतमी पाटील हिच्यावर अश्लील हावभाव करते असे बोलण्यात येतं. यांच्या या अशी कृतीमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोल लागल्याचे बोलले जात आहे.

पुणे : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील गेल्या काही दिवसापासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. उर्फी जावेद हिच्यावर अश्लीलता पसरविण्याचा तर गौतमी पाटील हिच्यावर अश्लील हावभाव करते असे बोलण्यात येतं. यांच्या या अशी कृतीमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोल लागल्याचे बोलले जात आहे. यावरून दोघांना निशाना केला जात आहे. यावरूनच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निशाना साधला आहेत. तक्रारी आल्या तर आपण त्यांना समज देऊ शकतो. पण कारवाईवर बोलताना त्या म्हणाल्या, एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती शील वाटत असते. त्याच्यामुळे अश्लील आणि शीलतेची परिभाषा ही स्थळ काळ परतवे बदलत राहते. याच्यामुळे आपण त्यांच्यावरती कोणती कारवाई करू शकत नाही पण आपण त्यांना समज देऊ शकतो.

Published on: Apr 20, 2023 08:34 AM