Maharashtra Politics : काँग्रेसच्या नेत्यांकडून रोहित पवार यांचा खरपूस समाचार? कोणी केली टीका? कोणी म्हटलं, रोहित...? तर कोणी भुट्टा?

Maharashtra Politics : काँग्रेसच्या नेत्यांकडून रोहित पवार यांचा खरपूस समाचार? कोणी केली टीका? कोणी म्हटलं, रोहित…? तर कोणी भुट्टा?

| Updated on: May 22, 2023 | 7:11 AM

ही जागा कोण लढवणार यावरून सध्या जोरदार घमासान होताना दिसत आहे. यावरूनच आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. त्यावरून आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.

मुंबई : सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कारण आहे ते काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) सुरु असलेली चढाओढ. ही जागा कोण लढवणार यावरून सध्या जोरदार घमासान होताना दिसत आहे. यावरूनच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. त्यावरून आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. तर कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी कडक शब्दांत फटकारलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. इथे कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल हे खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीसह रोहित पवार यांना दिला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अजून दूर आहे. पण, सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आताच शाब्दिक युद्ध पेटल्याचे दिसत आहे.

 

Published on: May 22, 2023 07:11 AM