उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला, डाळिंबाच्या बागेत-घरात पाणीच पाणी

उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला, डाळिंबाच्या बागेत-घरात पाणीच पाणी

| Updated on: Jan 29, 2023 | 9:56 AM

उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटलाय. पाहा...

सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटलाय. उजनीचा उजवा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेस पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे पाटकुल गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंब, ऊसासह इतर पिकं वाहून गेली आहेत. ऊसासोबतच शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय.

Published on: Jan 29, 2023 09:54 AM