खराब रस्त्यामुळे सोलापुरकरांना नरकयातना; यमराजाने केला महापालिकेचा निषेध!

खराब रस्त्यामुळे सोलापुरकरांना नरकयातना; यमराजाने केला महापालिकेचा निषेध!

| Updated on: Aug 05, 2023 | 12:07 PM

सोलापुरात खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे अनेक नागरिकांना नरक यातना सहन करावी लागत आहे.यासाठी त्रस्त नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे.

सोलापूर, 5 ऑगस्ट 2023 | खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांना नरक यातना सहन करावी लागत आहे.यासाठी त्रस्त नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे. सोलापूर महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी खुद्द यमराजच आंदोलनासाठी उतरले आहेत. सोलापूर शहरातील खड्ड्यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक यमराज रस्त्यावर अवतरले. सोलापूर शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने शरद पवार गटाचे युवा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. प्रतिकात्मक यमराजाने खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देत महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

Published on: Aug 05, 2023 12:07 PM