सोलापुरातील आयजीएम कंपनीच्या टोल नाक्यावर भाजपकडून आंदोलन
Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणीत भाजपचं टोल बंद आंदोलन .नांदणीतील आयजीएम कंपनी टोलनाका विरोधात टोल बंद आंदोलन करण्यात आलं. पाहा व्हीडिओ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील आयजीएम कंपनीच्या टोल नाक्यावर भाजपकडून टोल बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नांदणीतील आयजीएम कंपनी टोलनाका विरोधात टोल बंद आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी भाजपने टोल नाक्यावर स्थानिकांना नोकरी आणि टोलमाफीची मागणी केली होती. यासंदर्भात कंपनीने आश्वासन देखील दिलं होतं. परंतु आश्वासन पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. आमदार सुभाष देशमुख यांनी या आंदोलनात मध्यस्थी करत मागण्या पूर्ण करत असल्याचं लेखी पत्र कंपनीच्या प्रशासनाला देण्यास सांगितलं. दरम्यान या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. येत्या पंधरा दिवसात या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यापेक्षा तीव्र चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.