Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Rain News : भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

Solapur Rain News : भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

| Updated on: Mar 24, 2025 | 8:27 PM

Solapur Distortion News : भर उन्हाळ्यात सोलापूरमध्ये अवकळी पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडलेली दिसली. तर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

भर उन्हाळ्यात सोलापूरमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने सोलापूरकरांची तारांबळ उडाली. यावेळी पावसासोबत वादळी वारे देखील सुरू झाल्याने शहराच्या काही भागात झाडांची पडझड झाली आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. तर झाडांची पडझड झाल्याने काही ठिकाणी वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला होता.

Published on: Mar 24, 2025 08:27 PM