Sonya Maruti Ganapati ला चढणार नव्या आभूषणांचा साज; 21 किलो चांदी, 9 तोळे सोनं अन्…
VIDEO | सोलापूरच्या श्री सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला यंदाच्या वर्षी 21 किलो चांदी, 9 तोळे सोने अशा आभूषणांचा साज चढवण्यात येणार, बघा व्हिडीओ यंदा काय असणार आणखी खास आकर्षण
सोलापूर, १५ सप्टेंबर २०२३ | श्री सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला यंदाच्या वर्षी नव्या आभूषणांचा साज चढवण्यात येणार आहे. या मंडळाच्या श्रींच्या मूर्तीस यंदाच्या वर्षी 21 किलो चांदी, 9 तोळे सोने आणि विविध रंगाच्या खंबानी खड्यांचा वापर करून निर्माण केलेल्या आकर्षक अशा आभूषणांचा साज चढवण्यात येणार आहे. 1947 सालापासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या गणेश मंडळाकडे पाहिले जाते. मुंबई येथील प्रख्यात कारागीर संजय वेदक यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण आभूषणे तयार केले आहेत. मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता चार हुतात्मा स्मारकापासून श्रींची मिरवणूक काढत सोन्या मारुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या नव्या आभूषणामुळे श्रींची मूर्ती आणखी सुंदर आणि सुबक असल्याचे पाहायला मिळणार आहे.