अखेर ''या'' किल्ल्याला निधी मिळाला!, संवर्धनाचे कामही सुरू; विहिरीची डागडुजी होणार

अखेर ”या” किल्ल्याला निधी मिळाला!, संवर्धनाचे कामही सुरू; विहिरीची डागडुजी होणार

| Updated on: May 28, 2023 | 9:12 AM

सोलापूरचा भुईकोट किल्ला हा 1656 मध्ये आदिलशहाने बांधल्याचा इतिहास संशोधकांचा दावा आहे. तर 1664 साली हा किल्ला मराठ्यांनी आणि नंतर निजामांने जिंकला. हा किल्ला 32 एकर क्षेत्रात विस्तारलेला असून क्षेत्रफळाच्यादृष्टीने नंबर दोनचा किल्ला होता.

सोलापूर : अखेर सोलापुरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. याच्यासाठी निधी प्राप्त झाला असून आता संवर्धनासह विहिरीची डागडुजीच्या कामाला गती आली आहे. सोलापूरचा भुईकोट किल्ला हा 1656 मध्ये आदिलशहाने बांधल्याचा इतिहास संशोधकांचा दावा आहे. तर 1664 साली हा किल्ला मराठ्यांनी आणि नंतर निजामांने जिंकला. हा किल्ला 32 एकर क्षेत्रात विस्तारलेला असून क्षेत्रफळाच्यादृष्टीने नंबर दोनचा किल्ला होता. तर किल्ल्याला अनियमी लंबोड्या आकाराची आणि दुहेरी तटबंदी आहे असून किल्ल्याच्या तिन्ही बाजूला 30 मी. लांबीचे खंदक असल्याने आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीच्या दुष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. आता हा किल्ला 1912 साली भारतीय पुरातत्त्व खात्याकडून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आला आहे. पण मागील वीस वर्षापासून किल्ल्याची दुरवस्था झाली होती. दरम्यान या किल्ल्याला अखेर निधी प्राप्त झाला असून दुरुस्तीचे काम सुरू झाले. यात भुईकोट किल्ल्यासह किल्ल्यातील पुष्कर्णी विहिरीच्या डागडुजीचेही काम प्रगती पथावर आहे.

Published on: May 28, 2023 09:12 AM