भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन होणार?

भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन होणार?

| Updated on: Oct 17, 2024 | 4:03 PM

भाजपाच्या काही विद्यमान आमदारांचा यंदा पत्ता कट होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भाजपाच्या पार्लेमेंट बोर्ड कमिटीची बैठक झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेदवारांची घोषणा करतील, पण मी एवढेच म्हणेन की योग्य उमेदवारांना तिकीटे मिळतील असे भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

राज्यात निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणूकांसाठी मोठ्या प्रमुख पक्षांनी अजूनही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. परंतू भाजपाच्या 110 उमेदवाराती पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपाच्या काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपाचे शीव- कोळीवाडा येथील विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. वर्सोव्यात भारती लव्हेकर यांच्या ऐवजी संजय पांडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. घाटकोपर पश्चिम येथे राम कदम यांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. घाटकोपर पूर्व येथे पराग शाह यांच्या जागी प्रकाश मेहता यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. बोरीवलीत सुनील राणे यांच्या जागी गोपाल शेट्टी यांचे पुनर्वसन होणार असल्याचे समजते.

Published on: Oct 17, 2024 03:54 PM