काही लोकांचा शौक असा की माझा…काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय गेल्यानंतर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याने आता फडणवीस यांचे गृहमंत्री पद काढून ते अजितदादांना द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अलिकडे केली होती. आता त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काहींना सकाळी उठून माझा राजीनामा नाही मागितला तर अपचन होते असा टोला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच पुण्यात मोठे ड्रग्जचे रॅकेच उघडकीस आले. त्यानंतर आलिशान पोर्शे अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदाराचा पोलिस ठाण्यात मध्यरात्री येऊन पोलिसांनी कारवाई करु नये म्हणून दबाव आणण्याचे प्रकरण असो की कल्याण येथे शिंदे गटाच्या नेत्यावर भाजपाच्या आमदाराने गोळीबार करणे किंवा पश्चिम उपनगरात शिवसेनेचे नेते अभिजित घोसाळकर यांच्यावर एका कार्यकर्त्यांनी फेसबुकवर लाईव्ह करीत गोळीबार करणे या घटनांना देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्रालयाची जबाबदारी डागाळली आहे.
Published on: Aug 31, 2024 03:02 PM
Latest Videos