Ajit Pawar : जनता कुणाच्या मागे लवकरच कळेल, अजित पवारांचे दसरा मेळाव्यावरुन वक्तव्य

Ajit Pawar : जनता कुणाच्या मागे लवकरच कळेल, अजित पवारांचे दसरा मेळाव्यावरुन वक्तव्य

| Updated on: Sep 03, 2022 | 7:22 PM

पहिल्यांदा मेळावा एकाच आणि नंतर दुसऱ्याला संधी मिळेल असा तर्क त्यांनी लावलेला आहे. मात्र, जनता कुणाच्या मागे आहे हे देखील लवकरच समोर येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तर निवडणूक झाल्यावरच कळेल की सेना कुणाची. त्यामुळे सध्या दसरा मेळाव्यावरुन वाद होत असले तरी हा सर्व निकाल जनतेच्या दरबरात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई : सध्या शिवतीर्थावर (Dussehra Gathering) दसरा मेळावा कुणाचा होणार यावरुन राजकारण तापले आहे. मेळाव्याचे ठिकाण ते कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार यावरुन देखील आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याबाबत (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र, उपस्थित राहणाऱ्या जनतेला महत्व दिले आहे. या मेळाव्यात जनता कुणाच्या मागे आहे हे लवकरच कळेल असे त्यांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यातील (Politics) राजकीय घडामोडी ह्या सर्वांनी पाहिलेल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये पॉवर तेच निर्णय घेतील. त्यामुळे पहिल्यांदा मेळावा एकाच आणि नंतर दुसऱ्याला संधी मिळेल असा तर्क त्यांनी लावलेला आहे. मात्र, जनता कुणाच्या मागे आहे हे देखील लवकरच समोर येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तर निवडणूक झाल्यावरच कळेल की सेना कुणाची. त्यामुळे सध्या दसरा मेळाव्यावरुन वाद होत असले तरी हा सर्व निकाल जनतेच्या दरबरात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 03, 2022 07:22 PM