CM Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार’ – TV9
हवं तर मी 'मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई: महाराष्ट्रात एका रात्रीत राजकीय भूकंप घडवत शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलें. त्यानंतर अख्या राज्यासह शिवसेनेत (shivsena)एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. तर महाविकास आघाडी सरकार देखील अल्पमतात आले आहे. त्यामुळे पडणाऱ्या सरकारला सावरण्यासह शिवसेनेत पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी पँच शोधला जात आहे. तसेच शिंदेसह बंडखोर आमदारांना समजावण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सुरतला गेले होते. मात्र त्यांना यात यश आले नाही. यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आपली आज भूमिका मांडली. यावेली त्यांनी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, मला खुर्चीचा मोह नाही. मला ओढून ताणून बसणार नाही. मी शिवप्रमुखांचा पुत्र आहे. त्यामुळे मला कोणताही मोह ओढू शकत नाही. या समोर बोला.. हवं तर मी ‘मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.