मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तुम्ही ‘मुंबई वन’ कार्डचा वापर करताय?
VIDEO | 'मुंबई वन' कार्डचा वापर करून मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार विशेष सवलत
मुंबई : पश्चिम उपनगरातील मेट्रो – 7 आणि मेट्रो 2 (अ ) या नुकत्याच सुरू झालेल्या दोन मेट्रो मार्गिकाने रोज प्रवास करणाऱ्या 1.4 लाख प्रवाशांना आता महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने विशेष प्रवास सवलत योजना जाहीर केली आहे. मुंबई मेट्रो वन कार्डच्या मार्फत ही विशेष सवलत मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार 30 दिवसांच्या कालावधीत 45 वेळा मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 15 टक्के सुट तर 60 वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 20 टक्के सूट मिळणार आहे. मुंबई मेट्रो मुंबईतील विविध स्थानकावर प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी ‘अमर्याद ट्रीप पास’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार एक दिवसीय अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये 80, तर 3 दिवसांच्या अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये 200 इतके असणार आहे.