Special Report | 13 तास ईडीकडून चौकशी, Anil Parab यांचं काय होणार?-TV9
सकाळी 6 वाजता जेव्हा ईडीची टीम जेव्हा परबांच्या शासकीय निवासस्थानावर धडकली. तेव्हा परब घरीच होते. छापेमारी बरोबरच परबांचीही कसून चौकशी झालीय. त्यामुळं परबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतही जाता आलं नाही. आणि आता अनिल परबांना अटक होणार, असा दावा सोमय्यांनी केलाय.
उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि परिवहन मंत्री अनिल परब पुन्हा ईडीच्या घेऱ्यात आलेत. ईडीनं एकाचवेळी अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित, 7 ठिकाणी छापेमारी केलीय. परबांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारावर छापा, वांद्रेमधील खासगी घरावर छापा, दापोलीतल्या साई रिसॉर्टवर छापा, दापोलीतल्या आणखी एका मालमत्तेवर छापा, पुण्यातील निकटवर्तीय विभास साठेंच्या घरी छापा, विभास साठेंच्या पुण्यातील दुसऱ्या घरीही छापा, कुर्ल्यातील निकटवर्तीयांच्याही घरी छापा, सकाळी 6 वाजता जेव्हा ईडीची टीम जेव्हा परबांच्या शासकीय निवासस्थानावर धडकली. तेव्हा परब घरीच होते. छापेमारी बरोबरच परबांचीही कसून चौकशी झालीय. त्यामुळं परबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतही जाता आलं नाही. आणि आता अनिल परबांना अटक होणार, असा दावा सोमय्यांनी केलाय.
आता ईडीनं परबांच्या घरावर छापेमारी का केली, ते आधी समजून घ्या. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन वाझेनं 100 कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात परबांचंही नाव घेतलंय. मनी लाँड्रिंग करुन बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. दापोलीत विभास साठेंकडून रिसॉर्टसाठी 1 कोटी 10 लाखांची जमीन खरेदी केली. आणि हा काळा पैसा असल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. तसंच दापोलीत साई रिसॉर्ट बांधण्यासाठी 25 कोटी कॅशमध्ये वापरले, असा सनसनाटी आरोपही सोमय्यांचा आहे. तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारा हाच तो साई रिसॉर्ट आहे..समुद्रकिनारी असलेला हा रिसॉर्ट CRZच्या नियमांचं उल्लंघन करुन बांधला..त्यामुळं हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण खात्यानं राज्य सरकारला दिले होते. 2 मेपर्यंत कारवाईच्या सूचना होत्या, पण अद्याप तरी रिसॉर्टवर महाविकास आघाडी सरकारनं कारवाई केलेली नाही.
परबांसंदर्भातली छापेमारी पुण्यातल्या विभास साठेंच्या घरापर्यंत पोहोचलीय…या आलिशान इमारतीतच विभास साठेंचा फ्लॅट आहे…इथंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केलीय… गेल्या 3 महिन्यातली कारवाई पाहिली तर 6 शिवसेनेचे नेते ईडीच्या फेऱ्यात आलेत…मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर…त्यांची 6 कोटी 45 लाखांच्या संपत्ती ईडीनं जप्त झालीय. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक…NSEL घोटाळा प्रकरणात 2 फ्लॅटसह 11 कोटी 35 लाखांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या पत्नी वर्षा संजय राऊत…त्यांची अलिबागच्या किहीम गावातील प्लॉट आणि दादरमधला फ्लॅट जप्त झालाय. शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव…चौकशीसाठी ईडीनं नुकतंच समन्स बजावलंय. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी. त्यांना आतापर्यंत 4 समन्स बजावलेत. पण एकदाही त्या हजर राहिल्या नाहीतआणि आता 6 वा नंबर मंत्री अनिल परबांचा लागलाय. ईडीकडून . एकाचवेळी 7 ठिकाणी छापेमारी केलीय.
मात्र ईडीच्या कारवाया म्हणजे केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. या टीकेला भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय..सूडबुद्धीनं कारवाई वाटत असेल कोर्टात जा, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. अनिल परबांच्या घरावर ईडीची छापेमारी झाल्यानं, गुणरत्न सदावर्ते भलतेच खूश झालेत…जैसी करनी वैसी भरनी असं सदावर्तेंना वाटतंय…तर, भाजपच्या अनिल बोंडेंनी ही कारवाई म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट असल्याचं म्हटलंय. अनिल परबांच्या घरावर छापेमारी झाल्यानंतर, कोल्हापुरात शिवसैनिकांनी आंदोलनही केलं…तर इकडे वांद्यातल्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमले. गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाया वाढल्या…आता परब प्रकरणात ईडीच्या हाती छाप्यातून काय लागतं, त्यावर पुढची कारवाई असेल…