Special Report | 'दाम्पत्य रिटनर्स'...राणा आक्रमक, सदावर्ते सक्रीय-TV9

Special Report | ‘दाम्पत्य रिटनर्स’…राणा आक्रमक, सदावर्ते सक्रीय-TV9

| Updated on: May 08, 2022 | 9:12 PM

जामीन मिळाल्याच्या काही दिवसांनंतर राणा आणि सदावर्ते दामप्त्य पुन्हा सक्रीय झालंय. एकीकडे रवी राणांनी राऊतांना टार्गेट केलंय. दुसरीकडे नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना निवडणुकीत उभं राहण्याचं चँलेज दिलंय.

जामीन मिळाल्याच्या काही दिवसांनंतर राणा आणि सदावर्ते दामप्त्य पुन्हा सक्रीय झालंय. एकीकडे रवी राणांनी राऊतांना टार्गेट केलंय. दुसरीकडे नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना
निवडणुकीत उभं राहण्याचं चँलेज दिलंय. आणि तिसरीकडे सदावर्तेंनी एसटी बँक निवडणुकीत
शड्डू ठोकण्याची तयारी केलीय.  अटकेच्या कारवाईआधी राणा आणि सदावर्तेंनी अनेक मुद्दयांवरुन सरकारवर टीकास्रं डागलं. राणांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचं तर सदावर्तेंनी एसटीवरुन सरकारला आव्हान दिलं. नंतर अटकेची कारवाई झाली. आणि दोघांना जामीन मिळाला. त्यानंतर कोर्टाच्या आदेशामुळे राणा दाम्पत्य माध्यमांशी बोललं नाही. आणि दुसरीकडे जामिनानंतर सदावर्तेंनीही माध्यमांना संयमी प्रतिक्रिया दिली. मात्र आज राणा आणि सदावर्तेंनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकारविरोधात हल्लाबोल सुरु केलाय. जामिनानंतर एसटीच्या बँक निवडणुकीत सदावर्ते सक्रीय झालेयत. एसटी बँकेचे राज्यात ९० हजार मतदार आहेत. सध्या एसटी बँकेवर राष्ट्रवादी आणि एसटी प्रणित संघटनेची सत्ता आहे.
त्याविरोधात सदावर्ते स्वतःचं पॅनल उभं करतायत.

एकीकडे सदावर्ते पॅनलची तयारी करतायत. दुसरीकडे मात्र राणा दाम्पत्याविरोधात सरकारी वकिल पुन्हा जामीन रद्द करण्याच्या तयारीला लागले आहेत. कारण, कोर्टानं राणा दाम्पत्यानं ४ अटींवर जामीन दिला होता. त्यातली एक म्हणजे जामिनानंतर अटकेबद्दलच्या कोणत्याही प्रकरणावर माध्यमांशी बोलू नये, ही एक अट होती. जर त्या अटीचं उल्लंघन झालं असेल, तर पुन्हा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी न्यायालयात जावू, असं सरकारी वकिलांनी म्हटलंय.

Published on: May 08, 2022 09:12 PM