Special Report | ‘माईक’…’चिठ्ठी’ आणि राजकीय टोलेबाजी-tv9
पण यावरुन विरोधकांच्या निशाण्यावर फडणवीस आलेत. पण अजित पवार काही एकदा बोलून मोकळे झाले नाही. तर माईक आणि चिठ्ठीच्या विषयावरुन दादांनी चिमटे काढणं सुरुच ठेवलंय.
आधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक घेतला आणि नंतर पत्रकार परिषद सुरुच असतानाच फडणवीसांनी कागदावर काही तरी लिहून ती चिठ्ठी मुख्यमंत्र्यांकडे सरकवली. कॅबिनेटमधल्या निर्णयांची माहिती देत असताना नेमकं काय घडलं ते आधी पाहा. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ते 50 हजारांचं अनुदान मिळणार आहे. त्यातून आधी कोल्हापूर, सांगलीतल्या शेतकऱ्यांना वगळलं होतं. पण आता त्यांनाही लाभ मिळेल, असं शिंदे सांगत होते. पण ते सांगतानाच शिंदे गटात्या नेत्यांसोबतच भाजपच्या धनंजय महाडिकांचंही नाव घ्यावं, अशी अपेक्षा फडणवीसांची असेल..म्हणून त्यांनी ती चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाडिकांचंही नाव घेतलं. पण यावरुन विरोधकांच्या निशाण्यावर फडणवीस आलेत. पण अजित पवार काही एकदा बोलून मोकळे झाले नाही. तर माईक आणि चिठ्ठीच्या विषयावरुन दादांनी चिमटे काढणं सुरुच ठेवलंय.