Special Report | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अजित पवार यांची बोचरी टीका -tv9
याआधी विधानसभेत अजित पवारांनी दरेकरांवरुन राज ठाकरेंच्या मास्क न वापरण्यावर टोला लगावला होता. मात्र यावेळी अजित पवारांनी मास्कवरुन राज ठाकरेंचे नाहक दिवस वाया गेले., इथंपर्यंत खोचक टीका केली.
मास्क न घालण्यावरुन अजित पवारांनी दुसऱ्यांदा राज ठाकरेंना टोमणा मारलाय. याआधी विधानसभेत अजित पवारांनी दरेकरांवरुन राज ठाकरेंच्या मास्क न वापरण्यावर टोला लगावला होता. मात्र यावेळी अजित पवारांनी मास्कवरुन राज ठाकरेंचे नाहक दिवस वाया गेले., इथंपर्यंत खोचक टीका केली. याआधी ठाकरे-पवारांमध्ये सकाळी कोण लवकर उठतं, यावरुन वाद झाला होता. यावेळी पुन्हा अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंच्या वेळेच्या नियोजनावर बोट ठेवलं. आतापर्यंत राज ठाकरेंच्या तिखट हल्ल्यांनंतर पवारांकडून संयमी उत्तरं यायची. मात्र जेव्हापासून राज ठाकरेंनी भोंग्याच्या आंदोलनावरुन पवारांना टार्गेट केलंय., तेव्हापासून
अजित पवार राज ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडत नाहीयत. मास्कबाबत अजित पवार कडक शिरस्त्याचे आहेत… मास्कवरुन त्यांनी आतापर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, खुद्द अजित पवारांचे रोहित पवार, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासहीत अनेकांवर टीका केलीय.