Special Report | राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांची जोरदार बॅटिंग! -tv9
पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, अजित पवारांनी चांगलीच बॅटिंग केली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सबुरीनं बोलण्याचा सल्ला देत, अजित पवारांनी हशा पिकवला. पाण्याच्या प्रश्नावरुन आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यासंदर्भात अजित पवार पवारांनी खालच्या शब्दात टीका केली.
पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, अजित पवारांनी चांगलीच बॅटिंग केली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सबुरीनं बोलण्याचा सल्ला देत, अजित पवारांनी हशा पिकवला. पाण्याच्या प्रश्नावरुन आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यासंदर्भात अजित पवार पवारांनी खालच्या शब्दात टीका केली. त्याची खंत आजही अजित पवारांच्या मनात आहे.हनुमान जन्मस्थळावरुन जो वाद सुरु झाला. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलंय. नाशिकमध्ये दोन महतांमध्ये जो राडा झाला. महंत सुधीरदास महाराज यांनी गोविंदानंद सरस्वती यांच्यावर माईक उगारला. त्याची नक्कलही अजित पवारांनी केली. पाण्यासंदर्भातल्या वक्तव्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर आत्मक्लेष केला होता. आता पक्षातला कोणी चुकला की ते तात्काळ त्या नेत्याला माफी मागण्यास सांगतात…नुकतंच अहिल्यादेवींवरच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी गोटेंना सुनावलं.