Special Report | मुंबईतील घटस्फोटांमध्ये 3 टक्के वाटा ट्रॅफिकचा! अमृता फडणवीसांच्या वक्तव्यानं नवा वाद

| Updated on: Feb 04, 2022 | 10:00 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपली वक्तव्ये, ट्वीट आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. आजही त्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. मुंबईत 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावाच अमृता फडणवीस यांनी केलाय. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांनी खोचक टीका केलीय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपली वक्तव्ये, ट्वीट आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. आजही त्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. मुंबईत 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावाच अमृता फडणवीस यांनी केलाय. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांनी खोचक टीका केलीय. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी एका सर्व्हेचा दाखला देत पेडणेकर यांना प्रत्युत्तर दिलंय.

अमृता फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, तुम्हाला माहिती आहे की मी सर्व्हे एजन्सी तर नाही. एका सर्व्हे एजन्सीमधून मला हा डेटा मिळाला होता. सर्व्हे मंकी डॉट कॉम यांनी सॅम्पलिंग केलं होतं लोकांचं आणि घटस्फोटाबाबत हा डेटा दिला होता की 3 टक्के लोकं हे घटस्फोट घेतात. त्यात अनेक कारणं होती आणि त्यातील एक कारण होतं ट्रॅफिक जॅम. त्यांच्या घरगुती आयुष्यावर परिणाम होत होता. पाच तास, चार तास, तीन तास त्यांचा वेळ ट्रॅफिकमध्ये जात होता. त्यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे घटस्फोट झाले, असा दावा त्यांनी केलाय.

Special Report | यूपीतील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा?
बंडातात्या कराडकार यांच्या याच वक्तव्याने मोठा वाद, ऐका नेमकं काय म्हणाले बंडातात्या…