Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?-TV9

Special Report | मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?-TV9

| Updated on: Jun 09, 2022 | 9:42 PM

आशिष शेलार अचानक ट्रायडेंटमध्ये आल्याने शिवसेना आमदार व पदाधिकारी धास्तावले भाजप अधिकाऱ्यांसोबत शेलारांनी ट्रायडंट हॉटेलच्या लॉबीत तासभर गप्पा मारल्या.. मात्र ते नेमक्या कोणत्या कामासाठी आले होते, हे कळू शकलं नाही.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी घोडेबाजाराचा आरोप दोन्हीकडून होतोय. मात्र एकामागून एक असे ३ भाजप नेते मविआचे आमदार थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलेत. काल रात्री भाजप नेते आशिष शेलार गेले. नंतर स्वतः भाजपचे उमेदवार असलेले धनंजय महाडिक पोहोचले…
त्यानंतर भाजपचे कृपाशंकर सिंह सुद्धा हॉटेल ट्रायडंटमध्ये गेले. जिथं शिवसेनेचे आमदार थांबले आहेत, त्या ट्रायडंट हॉटेलपासून भाजप आमदार थांबलेल्या ताज हॉटेलचं अंतर 3 किलोमीटरचं आहे. ट्रायडंटमध्ये सर्वात आधी काल रात्री भाजपचे आशिष शेलार पोहोचले. आशिष शेलार अचानक ट्रायडेंटमध्ये आल्याने शिवसेना आमदार व पदाधिकारी धास्तावले
भाजप अधिकाऱ्यांसोबत शेलारांनी ट्रायडंट हॉटेलच्या लॉबीत तासभर गप्पा मारल्या.. मात्र ते नेमक्या कोणत्या कामासाठी आले होते, हे कळू शकलं नाही.

नंतर आज ११ च्या दरम्यान धनंजय महाडिक हॉटेल ताजमधून हॉटेल ट्रायडंटमध्ये आले…..
माहितीनुसार धनंजय महाडिकांनी कालचा मुक्कामही शिवसेना आमदार थांबलेल्या हॉटेल ट्रायटंडमध्येच केला. नंतर दुपारी १ च्या दरम्यान भाजपचे कृपाशंकर सिंह हॉटेल ट्रायडंटमध्ये गेले. यामागचं कारण त्यांना विचारल्यावर त्यांनी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आपण हॉटेलमध्ये आलो होतो, असं कृपाशंकर सिंह म्हटले.  विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी कोरोना होऊनही फडणवीस आमदारांच्या बैठकीला हजर राहिले. आणि अशा तणावाच्या परिस्थितीत कृपाशंकर सिंह फॅमिली फक्शनसाठी हॉटेलमध्ये गेल्यामुळे त्याचीही चर्चा होतेय.

भाजप नेत्यांनंतर आता संजय राऊत सुद्धा भाजप आमदार थांबलेल्या ताज हॉटेलमध्ये जाणार आहेत. सर्वच म्हणतायत की आमच्यात कुणीच फुटणार नाहीत, मात्र एकीकडे भाजप नेते हॉटेल ट्रायडंटमध्ये येतायत आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंचा आजचा मुक्काम शिवसेना आमदार थांबलेल्या हॉटेलमध्येच असणाराय. एक-एक मत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत नेमकं कोण फुटेल, कुणाची चांदी होईल, यावरुन चर्चा होतायत. पण तूर्तास इकडच्या नेत्यांच्या तिकडे, आणि तिकडच्या नेत्यांच्या इकडे येरझारा सुरु झाल्यामुळे हॉटेल मालकांची चांदी तर नक्की आहे.