Special Report | अयोध्या दौऱ्याचा वाद संपेना, ‘राज ठाकरेंना रोखूनच दाखवा’, कांचनगिरींचं आव्हान!-TV9
राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं या पोस्टरमधून इशारा देण्यात आलाय. तर बृजभूषण सिंह मागे हटणार नाहीत, असं संजय राऊत म्हणतायत. बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवरुन मागे हटण्यास तयार नाही. त्यातच आता राज ठाकरेंच्या समर्थनात साध्वी कांचनगिरी मैदानात उतरल्यात. आणि त्याही बृजभूषण सिंहांना आव्हान देत आहेत.
माफी मागा, त्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश नाही, यावर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह ठाम आहेत. आणि आता राज ठाकरेंवर बृजभूषण सिंहांनी आणखी विखारी टीका केलीय..रावणाचं काय झालं हे लक्षात ठेवा, असा इशाराच बृजभूषण यांनी राज ठाकरेंना दिला. बृजभूषण सिंहांचा वाढता विरोध पाहता, राज ठाकरेंच्या मदतीसाठी साध्वी कांचनगिरी आल्यात..त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहून बृजभूषण सिंहांना आवरा, अशी मागणी केलीय. राज ठाकरे यांना अयोध्येला येण्यासाठी मी स्वत: निमंत्रण दिले आहे. बृजभूषण सिंहांना राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही अधिकार नाही. ते एका भक्ताला प्रभू श्रीरामाच्या दर्शनापासून दूर ठेवत आहे. अयोध्येची भूमी पवित्र आहे, ती सर्वांसाठी एकसमान आहे. जेव्हा आपण सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, तेव्हा बृजभूषण यांना कोणालाही रोखण्यासाठी अधिकार कोणी दिला ?. ही भेट फक्त एका भक्त आणि श्रीरामाची नाही तर हिंदुत्व एकजूट करण्यासाठी आहे. त्यामुळं ब्रृजभूषण यांना रोखावे अन्यथा त्यांना साधू समाजाच्या शक्तींचा सामना करावे लागेल.
बृजभूषण सिंह उत्तर प्रदेशच्या बाहेरही सभा घेत सुटलेत…आणि त्यांनी उत्तर भारतीयांना राज ठाकरेंच्या विरोधात एकत्र आणण्यास सुरुवात केलीय…तर बृजभूषण सिंहांमध्ये किती ताकद आहे तेच बघतेच, असा इशारा कांचनगिरीही देत आहेत. विशेष म्हणजे 2 दिवसांआधीच बृजभूषण सिंहांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी अचानक आल्या होत्या. राज ठाकरेंनी माझी माफी मागितली असून त्यांना अयोध्येत विरोध करु नका, असं कांचनगिरी म्हणाल्या होत्या. त्यावेळीही बृजभूषण सिंहांनी कांचनगिरीचं ऐकण्यास नकार दिला होता. बृजभूषण सिंह राज ठाकरेंच्या माफीवर अडून बसल्यानं आता कांचनगिरी चांगल्याच संतापल्यात. ज्यांचे हात दुसऱ्याच्या रक्तानं माखलेत, त्यांनी दुसऱ्यांना माफी मागण्यास सांगू नये असं कांचनगिरी म्हणतायत.
बृजभूषण यांच्या मित्रावर हल्ला झाला, त्याचा बदला म्हणून बृजभूषण यांनी हत्या करणाऱ्यालाच ठार केलं, आणि हे ते ऑनरेकॉर्ड कॅमेऱ्यावर बोलतात, त्यामुळं साध्वी कांचनगिरी बृजभूषण सिंहांना तुमचेच हात रक्तानं माखलेत असं म्हणतायत. 2008 मधल्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यातून उत्तर भारतीयांना मारहाण झाली..हाच मुद्दा बृजभूषण सिहांनी उचलून धरलाय. पण राज ठाकरेंच्या ती भूमिका परिस्थितीनुसार होती असं सांगून कांचनगिरी राज ठाकरेंचं समर्थन करत आहेत.
बृजभूषण सिंह वारंवार राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देत आहेत…त्यानंतर आता मनसेकडून मुंबईतल्या लालबागमध्ये बॅनर लागलेत. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं या पोस्टरमधून इशारा देण्यात आलाय. तर बृजभूषण सिंह मागे हटणार नाहीत, असं संजय राऊत म्हणतायत. बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवरुन मागे हटण्यास तयार नाही. त्यातच आता राज ठाकरेंच्या समर्थनात साध्वी कांचनगिरी मैदानात उतरल्यात. आणि त्याही बृजभूषण सिंहांना आव्हान देत आहेत.