Special Report | मुख्यमंत्री Uddhav Thackeray जाहीर सभा घेणार!-tv9
लवकरच सभा घेऊन नवं हिंदूंचा समाचार घेणार अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना इशारा दिलाय. मशिदीवरच्या भोंग्यांसंदर्भात राज ठाकरेंनी 3 मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यावरुन राजकारणही तापलंय. मात्र बिनकामाच्या भोंग्यांना काडीची किंमत देत नाही, असा सनसनाटी टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला.
लवकरच सभा घेऊन नवं हिंदूंचा समाचार घेणार अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना इशारा दिलाय. मशिदीवरच्या भोंग्यांसंदर्भात राज ठाकरेंनी 3 मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यावरुन राजकारणही तापलंय. मात्र बिनकामाच्या भोंग्यांना काडीची किंमत देत नाही, असा सनसनाटी टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यावरुन ठाकरेंना आव्हान दिलं होतं…त्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा असं चित्र मुंबईत निर्माण झालं. यापुढं दादागिरी कराल तर दादागिरी मोडून काढू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तर उद्धव ठाकरेंची सध्याची भाषणं म्हणजे आक्रस्ताळेपणा आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केलीय. भाजपसह मनसेनंही शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केलीय. त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. मात्र लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनीही आपले इरादे स्पष्ट केलेत.