अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची ‘दादा’गिरी वादात, पाहा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवरून तुफान आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे यांचे प्रचार सभेमधील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
महाराष्ट्रात नुकतेच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे मतदान केंद्रावर पवार गटाचं काम करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्याच बरोबर धनंजय मुंडे देखील एका सभेमध्ये कोण जिल्ह्याचा खासदार होणार याच्या पेक्षा तुमच्या गावातील पुढारपण तुमच्याकडे राहणार का? यांच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे असं त्यांनी एका सभेमध्ये विधान केलं आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांवरून ‘दादा’गिरी सुरु आहे की काय असं मतदारांना वाटत आहे.
Published on: May 11, 2024 12:53 PM
Latest Videos